नाशिक जिल्ह्यात होम क़्वारंटाईन केलेल्या दोघांवर गुन्हा दाखल- पिंपळगाव बसवंत पोलिसांची कारवाई

नाशिकमध्ये होम क़्वारंटाईन केलेल्या दोघांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गावाबाहेर फेरफटका मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

देशभरात संचारबंदी लागू आहे. जे विदेशातून आलेले नागरिक आहेत त्यांना होम क़्वारंटाईन करण्यात आले आहे. पिंपळगाव बसवंतचे हे दोन तरुण मुंबईलाही फेरफटका मारून आल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात कालच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या दोघा तरुणांबाबत नागरिकांनी तक्रार केली होती, त्यावरून पोलिसांनी या दोघांवर १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून, शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लासलगावच्या त्या तरुणाच्या कुटुंबीयांचीही तपासणी

नाशिक जिल्ह्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबीयांचीही आता तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील सर्व सात कुटुंबातल्या सदस्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले आहे.