पूर्ववैमनस्यातून मखमलाबाद रोडला एकावर गोळीबार

नाशिकमध्ये आठ दिवसात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या असतानाच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

मखमालाबाद रोड वर उदय नगरच्या चौकात एका इस्त्रीच्या दुकानात किरण भडंगे हा शर्ट इस्त्री करम्यासाठी आला असता अज्ञात तिघांनी गावठी कट्यातून किरण भडंगेवर गोळीबार केला. किरण याच्या डाव्या हाताला गोळी लागली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोर आणि जखमी या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. दरम्यान जखमी किरण भडंगे याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. तसेच ज्यांनी हल्ला केला ते सुद्धा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान संशयित हल्लेखोर फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाका बंदी केली आहे.