पंचवटी, जनशताब्दीसह प्रमुख रेल्वे आता १ जुलैपर्यंत रद्द

नाशिक (प्रतिनिधी): प्रवाशांच्या मे महिन्यातील प्रतिसादाची कोणतीही खातरजमा न करता रेल्वेने पुन्हा नाशिक जिल्ह्याची मुंबईशी नाळ जोडणारी जीवनवाहिनी पंचवटी एक्स्प्रेस तसेच मराठवाड्याशी जोडणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेससह राज्यातील प्रमुख प्रवासीप्रिय गाड्या थेट १ जुलैपर्यंत कमी प्रवासी संख्येचे एकतर्फी कारण देत गुरुवारी रद्द केल्या.

यामुळे राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत असला तरी रेल्वेने मात्र तो एकतर्फी १ जुलैपर्यंत वाढविल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांत संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत तातडीने लक्ष घालावे, अशी प्रवाशांची मागणी आहे