विशाखापट्टणमहून ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना !

नाशिक (प्रतिनिधी): आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०८.५० मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन येत असलेली एक्स्प्रेस ३१ तासांचा प्रवास करत राज्यात उद्या (दि. २४) दाखल होणार आहे.

राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन पुरवठ्याला परवानगी दिली होती. त्यानुसार कळंबोली येथून सोमवारी रात्री सात टँकरची ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली होती. ती गुरुवारी पहाटे पोहोचली. गुरुवारी रात्री विशाखापट्टणम येथील विझाग स्टील या कंपनीतून टँकर भरून ही एक्स्प्रेस पुन्हा महाराष्ट्राकडे येण्यासाठी रवाना झाली आहे.

एक्स्प्रेस राज्यात दाखल झाल्यानंतर काही टँकर हे पुणे, मुंबई आणि नाशिकसह जेथे गरज असेल त्या ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे समजते. एक्स्प्रेससाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे.