नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’चा संशयित रुग्ण दाखल

चीन नंतर जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा एक संशयित रुग्ण नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
या रुग्णाला कोरोनाचा व्हायरसचा संशय असला तरीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केलंय.

मूळचा चंद्रपूरचा असलेला हा 24 वर्षीय तरुण इटलीला शिक्षण घेतो. तो नुकताच भारतात परतला आणि त्याच्या नाशिकला रहात असलेल्या बहिणीकडे आला. शनिवारी त्याला तीव्र सर्दीचा त्रास जाणवू लागला. तो युरोपियन देशातून आलेला असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयाच्या स्वतंत्र कोरोनाचा विभागात ठेवण्यात आलंय.