नाशिकच्या पहिल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला डिस्चार्ज !

नाशिक(प्रतिनिधी): गेल्या २९ मार्चला दाखल झालेला पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नंतरच्या तिन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला कोरोनामुक्त घोषित करून रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलंय.यावेळी जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यासह प्रमुख प्रशासकीय आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते.