नोरा फातेहीचा हा देसी लुक पहिला का ?

आपल्या दिलखेचक नृत्याने चाहत्यांना घायाळ करणारी बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने टि्वटरवर तिचे साडीतले फोटो शेअर केले आहेत.

तिने सलमान खानच्या भारत या चित्रपटातही काम केले आहे. राजकुमार राव याच्या स्त्री या चित्रपटातही अफलातून नृत्य केले होते. तसेच वरुण धवन याच्या स्ट्रीट डान्सर 3 D या चित्रपटातील तिचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

फ्लॉरल रंगाच्या साडीत नोराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. यामुळे चाहत्यांनी तिच्या सौंदर्याची तोंडभरून स्तुती केली आहे.

काहीजणांनी ‘विदेशी अभिनेत्रीला देशी लुकमध्ये बघून खुपच आनंद झाला. तुझा हा लुक सगळ्यात बेस्ट आहे’ असे म्हटले आहे.
काही यूजर्सला नोराला साडीत बघून तिचे हाय गर्मी हे गाणे आठवत असल्याचे म्हटले आहे. मूळ कॅनेडाची असलेल्या नोराने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.