नाशिक शहरातील या भागात शनिवारी (दि. १२ जून) पाणीपुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन येथे विज वितरण कंपनीकडुन पॉवर ट्रान्सॅफॉर्मरची दुरुस्ती  करणेकरीता दि. 12/06/2021 रोजी सकाळी 09.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपावेतो महावितरण कंपनीकडुन वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल असे महावितरण कंपनीने कळविले आहे.

त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथुन होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने शनिवार दिनांक 12/06/2021 रोजी नविन नाशिक मधील प्रभाग क्र.24,25,26,22 भागश: व  27,28,29,31 या संपुर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. 14,15,23, 30 भागश: या प्रभागामंध्ये (सकाळ व सायंकाळचा ) संपुर्ण दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही.

तसेच रविवार दिनांक 13/06/2021 रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.