नवविवाहित जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न.. पतीचा मृत्यू तर ओढणी तुटल्याने पत्नी बचावली !

नाशिक: जिग्नेश आणि काजल या दोघांनी सप्तशृंगी गडावर दोन महिन्यांपूर्वीच लग्न केले होते. मात्र काल (दि.९) रोजी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा मृत्यू झाला तर गळ फासासाठी लावलेली ओढणी तुटल्याने पत्नी थोडक्यात बचावली ! आडगाव नाक्याजवळील वालझाडे शेडजवळ ही घटना घडली !

काजल ही मुळची सुरगाण्याची.. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिग्नेश धुमाड आणि काजल यांनी सप्तशृंगी गडावर माळा घालून लग्न केले. त्यानंतर ते आडगाव नाका येथील वालझाडे शेड जवळ गेल्या दहा दिवसांपासून राहू लागले. दि. ९ रोजी जिग्नेश घरी आला आणि त्याने “आपल्याला गळफास घ्यायचा आहे” असे पत्नी काजलला सांगितले. तिनेही होकार दिला आणि दोघांनी पत्र्याच्या एंगलला ओढणीने गळफास घेण्याचे ठरवले. यात जीग्नेशचा मृत्यू झाला तर पत्नी ज्या ओढणीने गळफास घेत होती, ती तुटल्याने थोडक्यात बचावली.