नाशिकच्या व्यापार्यांचे साडे आठ लाख पळवणाऱ्यास अटक

नेवासा येथे व्यापार्यांची साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळवणाऱ्या भुरट्याला पोलिसांनी तासाभरात अटक केली आहे.

नेवासा येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना व्यापाऱ्याची साडे आठ लाख रुपये असलेली बॅग या चोरटयांनी पळवली. त्यानंतर श्रीरामपूरच्या दिशेने ते मोटारसायकलवरून फरार झाले. पलायन केलेल्या या लुटारूला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना काल सायंकाळी (१७ ला) सातच्या सुमारास घडली.

दरम्यान याबाबत संजीव रघुनाथ नवाल (वय ५०) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या संशयित सागर राजू माने ( हिंजवडी पुणे) यांच्याकडून बॅग व रक्कम ताब्यात घेण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.