नाशिक शहरात एकाच दिवसात अजून 5 नवीन पॉझिटीव्ह रुग्ण

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि.8 मे 2020) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरामध्ये नव्याने 5 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सकाळीच 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते त्यात आता 5 रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी आलेल्या अहवालातील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धात्रक फाटा येथील 35 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 62 वर्षीय पुरुष, दिंडोरी रोडच्या तारवाला नगर येथील 66 वर्षीय महिला, कोणार्क नगर येथील 51 वर्षीय पुरुष आणि इतर भागातील एक 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

या रुग्णांचे सविस्तर पत्ते आणि नव्याने तयार होणारे कन्टेनमेंट झोन याबाबतची माहिती अद्याप येणे आहे.