नाशिक, येवला, सटाणा, मनमाड, दिंडोरी येथे नवीन पॉझिटिव्ह; फळविक्रेत्याचा समावेश !

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि.10 मे 2020) प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील अहवालानुसार एकूण 72 पैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर काल प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये सिन्नर येथील एक तर नाशिक शहरातील पाटील नगर भागातील 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. खरं म्हणजे लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.. त्यामुळे खरं तर आता खऱ्या अर्थाने काळजी घेण्याची गरज आहे.

काल काल प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये एक जण सिन्नर फाटा येथील रहिवाशी हा फळविक्रेता असून त्यास टायफेड झाल्याने दि. 8 मे 2020 रोजी तपासणीसाठी आला होता त्याचा दि. 9 मे 2020 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे  दाखल करण्यात आले आहे. तर  पाटील नगर सिडको येथील महिला ही  कोरोना बाधीत असल्याचा असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तिची आई कोरोना बाधित होती.

आज (दि.10 मे 2020) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये दिंडोरीच्या इंदोरे येथील 25 वर्षीय पुरुष आणि 18 वर्षीय पुरुष, सटाण्याच्या ताहाराबाद येथील 38 वर्षीय पुरुष, मनमाड येथील 55 वर्षीय महिला आणि दिंडोरीच्या निलवंडी येथील एका 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. येवल्याचे अहवालही चिंताजनक आहेत. येवल्याच्या सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते पुढीलप्रमाणे: पाटोदा, येवला येथील 38 वर्षीय पुरुष आणि 18 वर्षीय पुरुष, ओम साईराम कॉलनी, येवला येथील 49 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष आणि गंगा दरवाजा, येवला येथील 42 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.