‘नेट’ परीक्षा अर्जासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यूजीसी नेट परीक्षेच्या अर्जासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत आता १५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यूजीसी-नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (यूजीसी-नेट) परीक्षा जून २०२० मध्ये घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षादेखील आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे ही परीक्षा घेतली जात असते.

यूजीसी नेट परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ मार्चपासून सुरू झाली आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ व त्यानंतर ३१ मेपर्यंत अर्ज भरण्यास अंतिम मुदत होती.