धक्कादायक: दिल्लीच्या “त्या” कार्यक्रमात हजर होते नाशिकचे ३२ जण

दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या कार्यक्रमात नाशिकचे ३२ जण हजर होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने यासाठी धडक शोध मोहिम राबवून त्यापैकी २४ जणांना शोधून काढले आहे. शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या चार पथकांनी पोलिसांच्या मदतीने ही शोध मोहीम राबवली. नाशिकचे ३२ जण या कार्यक्रमात हजार असल्याची माहिती समोर आल्यानंतर यंत्रणा हादरली आहे आणि प्रशासानावरचा दबावही आता वाढला आहे.

त्यातील नाशिक मनपा हद्दीतील १३ नागरिकांना तपोवनात क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित ८ नागरिक अद्याप नाशकात आलेले नाहीत. तर ग्रामीण भागातील ११ व्यक्तींना त्यांच्या घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात तब्बल दोन हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे सांगितले जात आहे. यामधील काही लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या सोहळ्याला संपूर्ण देशातून लोक गेले होते, यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील बहुसंख्य नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी १०७ जण गेले होते. ते परतल्यानंतर आता कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्णातील अनेक नागरिक या सोहळ्याला गेले असावे, असा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

त्यापैकी ३२ नागरिक आरोग्य विभाग व पोलिसांनी शोधून काढले आहेत. नाशिक मनपा हद्दीत आढळलेल्या १३ नागरिकांना तपोवनातील मनपाच्या शासकीय निवासस्थानी क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तर उर्वरित ८ नागरिकांचा पोलीस तपास करीत आहेत.या पथकांनी नाशिक शहरासह ग्रामीण भागात अशा लोकांचा शोध घेतला. नाशिकमध्ये तर महापलिकेच्या वैद्यकीय पथकाने दिल्लीत जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती घेतल्यानंतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे यादी सोपवली होती. नाशिक शहरातील काही ठराविक उपनगरीय भागातील तसेच मालेगाव, निफाड, चांदवड, नांदगाव या तालुक्यांतील काही गावांमधील संबंधित नागरिक असल्याचे समजते.च्नाशिक शहरातील अनेक जण या कार्यक्रमाला गेले होते. त्यांची यादी महापालिकेने पोलीस यंत्रणेकडे सुपूर्द केली आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

सध्या सापडलेल्या १३ जणांना तपोवनात क्वॉरंटाइन करण्यात आले असून उर्वरित आठ व्यक्तींचा कसून शोध घेतला जात आहे. त्यांना हुडकून काढल्यानंतर त्यांनादेखील तपोवनात क्वॉरंटाइन केले जाणार आहे. तपोवनातील मनपा इमारतीत देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.