नाशिक प्राणवायू गळती; मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत जाहीर

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक बुधवारी सकाळी लिक झाला. त्यामुळे यावेळी २२ पेक्षा जास्त रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला.

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.