नाशिक शहरात अजून दोन कोरोनाबाधित; नाशिकरोड आणि जुने नाशिक भागातले

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि.१५ मे २०२०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरातून अजून दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात नाशिक रोड भागातील 49 वर्षीय पुरुष तर नाईकवाडीपुरा, जुने नाशिक येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. हे रुग्ण कुणाच्या संपर्कात आले होते, नक्की कुठे राहतात आणि यांची काय हिस्ट्री होती याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.