नाशिकच्या “त्या” संशयित कोरोना रुग्णाचा रिपोर्ट “निगेटिव्ह”

नाशिक: सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या “त्या” रुग्णाचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मूळचा चंद्रपूरचा असलेला हा 24 वर्षीय तरुण इटलीला शिक्षण घेतो. तो नुकताच भारतात परतला होता आणि त्याच्या नाशिकला रहात असलेल्या बहिणीकडे आला. शनिवारी त्याला तीव्र सर्दीचा त्रास जाणवू लागला होता. तो युरोपियन देशातून आलेला असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयाच्या स्वतंत्र कोरोनाचा विभागात ठेवण्यात आलं होतं.