नाशिक – सुरत अंतर ग्रीन फिल्डमुळे केवळ दोन तासांत !

नाशिक (प्रतिनिधी): ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरात अंतर केवळ २ तासात कापता येणे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यात नाशिक ते सुरात अंतर केवळ १७६ किलोमीटरवर येणार असल्याने कनेक्टीव्हीटी वेगवान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ६१ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गामुळे सहाही तालुक्यांच्या विकासाला वेग येणार आहे.