नाशिकमध्ये दुकानं बंद मात्र रस्त्यावर वर्दळ…

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिक जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकानं आणि व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय..

याच निर्णयानंतर आज नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याचे दिसून आले… मुख्य बाजारपेठा बंद असले तरी नागरिकांची वर्दळ मात्र कायम आहे…

काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं…नाशिककरांनी मात्र या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याची परिस्थिती आहे..

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही कठोर निर्बंध लागू केले असले तरी याची अंमलबजावणी मात्र नागरिक करताना दिसत नाही….

याच संदर्भात आज (दि. १३ मार्च २०२१) नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे आता लक्ष आहे.

सर्व छायाचित्रे: जयेश साबळे