नाशिक: नाका तोंडाला नोटा चोळून कोरोनाची भीती दाखवणाऱ्या विकृताला अटक !

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहेत, आणि जबाबदार नागरिक घरात बसून त्यांना सहकार्यही करत आहेत. मात्र अशातच एका विकृताने नाकाला आणि तोंडाला नोटा चोळून कोरोनाची भीती दाखवणारा व्हिडीओ टिकटॉकवर टाकला. काही क्षणात हा व्हिडीओ अनेकांनी डाऊनलोड केला आणि सोशल मिडिया वर तो व्हायरलही झाला..आणि पोलीस यंत्रणा सजग झाली..या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये घाबरत निर्माण झाली होती..

गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत होता…व्हिडीओतील हा व्यक्ती कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी याला शोधून काढले आणि त्याला बेड्या ठोकल्या ! ४० वर्षाचा हा इसम मालेगावचा असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हंटलय. या इसमावर कलम १५३ आणि १८८ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिल्लीच्या निजामुद्दीनची घटना ताजी असताना, असा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती..मात्र आता हा विकृत पोलिसांच्या ताब्यात आहे. याबद्दल नाशिक ग्रामीण पोलिसांचं अभिनंदन करायलाच हवं !