नाशिकचे माजी नगरसेवक बिलाल खतीब यांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बिलाल खातीब यांचा शनिवारी (दि. १३ जून २०२०) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ६२ वर्षाचे होते. ते कॅन्सरबाधितही होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर केमो थेरपी झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, हळूहळू प्रकृती खालावत गेली. आणि शनिवारी (दि. १३) दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

गंगापूर रोड परिसरातील खतीब डेअरीचे ते संचालक होते. त्यांचा करोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आल्यानंतर खतीब डेअरीशी संबंधित अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, ग्राहकांचा या डेअरीवरील विश्वास कायम होता. बिलाल खतीब हे काही दिवसांपासून कॅन्सरने जर्जर झालेले होते. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. बिलाल खतीब हे मनमिळावू स्वभावाचे होते.