तलवार हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार ‘गोल्ड्या’ ला अटक !

नाशिक (प्रतिनिधी): शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजविणारा तडीपार आणि सराईत गुंड मुजाहिद उर्फ गोल्ड्या अफजल खान याला इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गोल्ड्या हा साईनाथनगर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाकले यांना मिळाली होती.

साईनाथनगर चौफुलीजवळील जॉगिंग ट्रॅक येथे हा गोल्ड्या भरदिवसा हातात तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत माजवत असल्याचे पोलिसांना समजले.

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे बाकले यांनी तत्काळ धाव घेत तडीपार गोल्ड्याला तलवारीसह अटक केली.

त्याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तांच्या शास्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याचप्रमाणे बेकायदेशीर शास्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.