‘डीबी’मध्ये पोलिस आयुक्तांकडून नवीन कर्मचाऱ्यांना ‘सुवर्ण’संधी

नाशिक(प्रतिनिधी): शहरातील पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पदभार स्वीकारताच महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या शोध पथकांची वारंवार तक्रार येत होत्या, मात्र त्याची दाखल घेतली जात नव्हती. त्यामुळे नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना सध्याच्या तपासापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता डीबीमध्ये पोलीस आयुक्तांकडून नवीन कर्मचाऱ्यांना ‘सुवर्ण’संधी मिळणार आहे.

याबाबत परिमंडळ एक मध्ये निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परिमंडळ दोन मध्ये सुद्धा हे फेरबदल होऊ शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. आयुक्त पांडे यांनी घटकांशी केलेल्या चर्चेतून हा मुद्दा पुढे आला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांना परिमंडळ एक ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव या पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या गेल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बदल्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असून , हा निर्णय फक्त परिमंडळ एक पुरता मर्यादित आहे. व परिमंडळ दोनमधील पोलिस ठाण्यांमध्ये सुद्धा हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येऊ शकतो.