महत्वाची बातमी: पेट्रोलपंप सकाळी ८ ते ५ राहणार सुरु

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक डिस्ट्रिक पेट्रोल डीलर्स वेलफेयर असोसिएशनने सोमवार (दि.२३) पासून शहर व जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसरकारची पुढील सूचनापर्यंत येईपर्यंत पेट्रोलपंप या वेळेनुसार कार्यरत राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी नाशिक डिस्ट्रिक पेट्रोल डीलर्स वेलफेयर असोसिएशनने पेट्रोल व डिझेल विक्रीची वेळ कमी केली आहे. ग्राहकांनी पेट्रोलपंपावर मर्यादित येण्यासाठी वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल पुरेसे भरुन घ्यावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.