पेठ रोड: आरटीओ ऑफिस जवळ दोन मालट्रक एकमेकांवर धडकल्या; ५ जखमी

पेठ रोड: आरटीओ ऑफिस जवळ दोन मालट्रक समोरासमोर धडकल्या

नाशिक (प्रतिनिधी): पेठ रोडच्या आरटीओजवळील सिग्नलवर मध्यरात्रीच्या सुमारास दोन माल वाहतूक करणाऱ्या ट्रक एकमेकांवर धडकल्या. यात दोन चालकांसह पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही ट्रक ओव्हर लोडेड असल्याने नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकहून गुजरातला साखर घेऊन जाणारा ट्रक आणि गुजरातमधून नाशिकला मीठ घेऊन येणारा ट्रक यांनी पहाटेच्या सुमारास एकमेकांना धडक दिली. यात दोन्हीही ट्रक पलटी झाले. यात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. जोरदार आवाज आल्याने नागरिकांनी त्या दिशेला धाव घेतली आणि ट्रक मध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. अशातच परिसरातील काही लोकांनी साखरेच्या गोण्याही पळविल्या.