नाशिक: क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून लाखो रुपयांचा गंडा

स्थानिक पातळीवर गुन्हेगारीत वाढ होत असतानाच सायबर गुन्हेही वाढत चालले आहेत. यात नागरिकांचा निष्कळजीपणाच कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. सध्या ओनलाइन पेमेंट करण्यासाठी प्ले स्टोअर वर अनेक ऍप्स उपलब्ध आहेत, आणि आता याच्यावरूनच फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. बघूया, नाशिकला काय घडलं..

रोहित सोहेल यांनी एका खरेदी विक्रीच्या ऍपवर जुने साहित्य विकण्याबाबत जाहिरात दिली होती. एका व्यक्तीने या वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शवली. आणि ऑनलाइन पैसे पाठवतो आणि नंतर साहित्य घेतो असे सांगितले. सोहेल यांनी व्यवहार केला. संशयिताने सोहेल यांना क्यूआर कोड पाठवला आणि तो स्कॅन करण्यास सांगितला. आणि पैसे घेण्याची रिक्वेस्ट पाठवली. ती एक्सेप्ट करताच सोहेल यांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम काढली गेली. सोहेल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज – वरिष्ठ पो.नि. देवराज बोरसे

Senior Police Inspector: Devraj Borse

“नागरिकांनी ओनलाइन व्यवहार करतांना काळजी घ्यावी आणि कुठलाही क्यूआर कोड स्कॅन करू नये, कारण क्यू आर कोड स्कॅन करून पैसे आपल्याला येत नसतात तर समोरच्या व्यक्तीचा क्यूआर कोड आपण स्कॅन करून त्याला नकळत पैसे पाठवत असतो. आणि अशाच प्रकारे भामटे आपली फसवणूक करतात त्यामुळे, नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी” असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी केले आहे.