पंचवटी पोलिसांची धडक कारवाई; चार लाखाचा अवैध दारू साठा जप्त !

पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अमोल साळवे या व्यक्तीकडून तब्बल चार लाख पन्नास हजार रुपयांचा देशी दारूचा अवैध साठा जप्त केला.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कुणी अवैधरीत्या विक्री किंवा साठ करत असेल तर त्यांच्यावर कारवाईची मोहीम नाशिक पोलिसांनी सुरु केली आहे. आज पंचवटी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पंचवटी पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकास मखमलाबाद नाका येथे एक शेवरलेट कंपनीची चार चाकी वाहन MH 15 DX  40 10 गाडी संशयास्पदरीत्या जाताना आढळून आली. पोलिसांनी तिचा पाठलाग सुरु केला आणि तपासणी केली. या तपासणीत गाडीमध्ये देशी दारू प्रिन्स संत्रा चे आठ बॉक्स मिळून आलेले आहेत. सदरचे वाहन चालक अमोल साळवे राहणार चम्‍पा नगर जेल रोड नाशिक रोड यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. हा माल एकूण ४ लाख पन्नास हजार रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. सदरची कारवाई पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार कर्मचारी हेडकॉन्स्टेबल विलास बसते मयूर हजारी संतोष काकड विष्णू जाधव योगेश सस्कर अशाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.