नाशिक मनपा क्षेत्रासाठी घटना व्यवस्थापक म्हणून प्रवीण आष्टीकर यांची नियुक्ती

जिल्ह्यासाठी घटना व्यवस्थापक म्हणून लीना बनसोड यांची नियुक्ती कायम

नाशिक (प्रतिनिधी): संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अनेक उपाययोजना राबवून विविध निर्णय जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात देखील त्रिस्तरीय रचनेची स्थापना करुन त्याचा समन्वय ठेवण्यासाठी अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय आदेशान्वये दिली आहे.

त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची महानगर पालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भाग व नगरपालिका क्षेत्रासाठी घटनाव्यवस्थापक म्हणून करण्यात आलेली नियुक्ती पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आली असल्याचेही श्री.मांढरे यांनी या आदेशात नमुद केले आहे आहे.