नाशिक: भाजीपाला खरेदीसाठी ६ विभागात ६ नवीन मैदाने

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना covid-19 विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत असताना शहरातील ६ विभागात ६ नवीन मैदाने तयार करून नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करीत असून सामायिक अंतर (सोशल डिस्टन्ससिंग) या विषयावर विशेष भर दिला जात आहे.

मात्र नाशिक महानगरपालिकेने निश्चित केलेल्या आठवडे बाजार तसेच भाजीपाला विक्रीच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून सामायिक अंतर (सोशल डिस्टन्ससिंग) राखणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दोन व्यक्तींमध्ये विक्रेता व ग्राहक, ग्राहक व ग्राहक यांच्यात सुरक्षित किमान एक मीटर अंतर व दुकानांमध्ये अंतर हे ५ मीटर ठेवणे बंधनकारक असून संबंधित ठिकाणी भाज्यांची हाताळणी वारंवार अनेक नागरिकांकडून महिलांकडून होत असल्याने सदरच्या भाज्या पॅकेजिंग मार्केटमध्ये विक्री बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तथापि देखील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी एकाच वेळी गर्दी करीत आहे.ही होणारी गर्दी टाळणेच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने ६ विभागात ६ मनपाच्या मालकीचे मैदाने व मोकळी जागा या ठिकाणी नव्याने जागा निश्चित केलेल्या आहेत.

नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रमांक ३० इंदिरानगर घरपट्टी उपकार्यालया जवळील मनपा खुली जागा, नाशिक पश्चिम विभागात शिवसत्य मैदान,पंचवटी विभागात निलगिरी बाग,औरंगाबाद रोड,नाशिकरोड विभागात शिखरेवाडी मैदान, सातपूर विभागातील सातपूर क्लब हाऊस मैदान,ई.एस.आय हॉस्पिटल मागे,एमआयडीसी सातपूर व नवीन नाशिक विभागात पवननगर मैदान येथे भाजीपाला व फळ विक्री साठी ठिकाणी निश्चित केली असून त्या ठिकाणी सामायिक अंतर (सोशल डिस्टन्ससिंग) राखणेच्या दृष्टीने रेखांकन करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.