नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली; शहरात 2, देवळाली 7 आणि येवला 16 पॉझिटीव्ह

नाशिक (प्रतिनिधी): आज (दि. 5 मे 2020) रात्री 9.57 मिनिटांनी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नाशिक शहर 75 वर्षीय महिला, निर्माण सोसायटी, कॅनडा कॉर्नर, तर 55 वर्षीय पुरुष, गंगापूर रोड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे देवळाली येथील 7 पॉझिटीव्ह तर येवला येथील 16 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर मालेगाव येथील मालेगाव येथील 17 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.