नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त कैलास जाधव यांनी स्वीकारला पदभार

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांनी नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला  आहे. जाधव यांची नाशिकच्या मातीशी नाळ असून कर्म भूमी असल्याचे म्हंटले केले आहे. आयुक्त जाधव यांनी 1998 मध्ये निफाडचे प्रांतधिकारी म्हणून काम बघितले आहे. वर्ष 2000 ते 2004 या कालावधीत त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज सांभाळले आहे. त्याचप्रमाणे जाधव यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन देखील केले आहे.