नाशिक शहरात अवघ्या दोन वर्षांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): शहरातील सिडको भागातून अवघ्या दोन वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यापूर्वी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात हा मुलगा आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. नाशिकमध्ये एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने चिंता वाढणार आहे. शिथिलता दिली असली तरीही नाशिकच्या नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळायचे आहेत. अन्यथा नाशिक मध्ये चिंता अजून वाढू शकते..