नाशिक: शहरात नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अजून 4 कन्टेनमेंट झोन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. 2 मे 2020) सहा नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने नवीन चार प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कन्टेनमेंट झोन केले आहेत. शहरातील आकडा अचानक वाढल्याने नाशिककरांनी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन हा नागरिकांच्या हितासाठी आहे. खरेदी करायला जातांना सुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवायला हवे. जोखमीचा काळ सुरु झालेला आहे.

नाशिकमध्ये केलेले नवीन कन्टेनमेंट झोन
सातपूर कॉलनी

सावतानगर

पाथर्डी फाटा

उत्तम नगर