मंगळवारी शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने अजून दोन कन्टेनमेंट झोन

नाशिक(प्रतिनिधी): मंगळवारी (दि. 5 मे 2020) नाशिक शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर अजून दोन कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत. एक म्हणजे द्वारका येथील मानेक्षा नगर आणि गंगापूर रोड येथील शांतीनिकेतन चौक. काल कोरोनाबाधित आढळून आलेली 75 वर्षीय महिला ही कॅनडा कॉर्नर येथील असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांचा मूळ रहिवास हा द्वारका येथील मानेक्षा नगर येथील आहे.

त्यामुळे या ठिकाणी कन्टेनमेंट झोन करण्यात आले. त्याचप्रमाणे अजून एक कोरोनाबाधित आढळून आलेला 55 वर्षीय पुरुष हा ऋषीराज प्राईड, शांती निकेतन चौक, गंगापूर रोड येथील रहिवासी असल्याने त्या ठिकाणी एक कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहे.