प्रियकराला मोबाईल आणि बाईक घेऊन देण्यासाठी प्रेयसीचा नातेवाईकांच्याच घरात डल्ला!

नाशिक (प्रतिनिधी) : प्रियकराला मोबाईल आणि बाईक घेऊन देण्यासाठी अल्पवयीन प्रेयसीने प्रेमापोटी नातेवाईकांच्याच कार्यक्रमात चोरी केल्याची घटना घडली. जानकी नागपाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाटीदार भवन येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काही नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. नागपाल यांची नणंद आणि त्यांची १६ वर्षिय नातही कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या होत्या.

वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर त्या रात्रभर नागपाल यांच्या घरीच मुक्कामी थांबल्या. घरातील सगळेजन झोपल्यावर या अल्पवयीन प्रेयसीने २६ हजार रोख रक्कम आणि आणि घरात असलेले लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. त्यानंतर घरी जातांना ते सर्व दागिने आणि रोख रक्कम प्रियकराच्या ताब्यात दिले.

काही तासांतच नागपाल कुटुंबाला आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी मुंबई नाका पोलीस टाण्यात धाव घेतली. त्यानंतर अवघ्या दोन तासात या चोरीचा छडा लावत चोरी झालेले दागिने आणि रोख पैसे असे एकूण सहा लाख ४० हजारांचा ऐवज जप केला आणि या प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले.