महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पिजी मेडिकल परीक्षा पुढे ढकलल्या !

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तर्फे उन्हाळी 21 च्या मेडिकल विद्या शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षा दिनांक 24 जून 2021 पासून सुरू होणार होत्या. तथापि सद्य परिस्थिती पाहून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात येईल अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक यांनी दिली आहे.