पहिल्याच दिवशी पावसाची दमदार सलामी

नाशिक (प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून साधारणतः आठ दिवसांनी लांबला होता. महाराष्ट्रामध्ये मान्सून ने पहिल्याच दिवशी दमदार हजेरी लावली.  

१२ जून रोजी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटासह ३०-४० किमी प्रतितास वेगाचा वादळी वारा वाहण्याची शक्यता आयएमडी कडून दर्शवण्यात आली होती त्यानुसार नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंदही झाली.

त्यानंतर आता १३ जून रोजी जळगाव, पुणे आणि अहमदनगर, धुळे, नदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. तसेच येत्या ४-५ दिवसात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू