नाशिकमध्ये पावसाचे वातावरण ; तापमानाचा पाराही उतरला

नाशिक शहरात सोमवारी ढग दाटून आले असून पावसाचे वातावरण तयार झाले आहे..

नाशिक (प्रतिनिधी):घामाच्या धारांनी त्रस्त नाशिककरांना आज गार वाऱ्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. या वर्षी १ जुन रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होणार असून ८ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. परंतू नाशिक शहरात आजच पावसाचं वातावरण झालेले दिसून येतंय. नाशिकमधील सटाणा तालुक्यात पावसाच्या सरीही कोसळल्या.

यंदा मे अखेर पर्यंत तापमानाचा पारा हा ४० अंशावर स्थिरावला होता. मात्र आज सकाळपासूनच आर्द्रतेचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले होते त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. अशातच आज नव्याने लॉक डाऊन ५.० सुरु झाला. म्हणजेच लॉक डाऊन मध्ये बऱ्यापैकी शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे आज वाहतुकीतही वाढ झाली. मात्र दुपारनंतर ढग दाटून आल्याने, आणि पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे वाहनचालकांनी घरचा रस्ता धरला. कालपेक्षा आजच्या तापमानाचा पारा ४ अंशाने उतरला. काल म्हणजेच रविवारी कमाल तापमान ३८.३ होते तर आज ३४.९ इतके होते. तर किमान तापमान २४.२ इतके होते.