हृदयद्रावक: बिबट्याचा ३ वर्षाच्या चिमुकलीवर ह’ल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी येथील  कु. गौरी गुरुनाथ खडके वय वर्ष 3 दि-22/6/202 रोजी रात्री च्या  सुमारास घरच्या दारा जवळ आईच्या शेजारी बसली असताना अचानक बिबटया ने ह’ल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेलं.

ही सर्व घटना मुलीचे आई,वडील,आजोबा, यांच्या समक्ष घडली असता त्यांनी आरडा ओरडा केल्याने व त्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली सदर घटना समजताच इगतपुरी वन क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली काही ग्रामस्थांनी व कर्मचारी यांनी तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार घेऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासठी नाशिक येथील जिल्ह्याग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या ह’ल्ल्यात जखमी झालेल्या चिमुरडीवर नाशिकच्या जिल्हा रुगणालयात उपचार सुरू होते मात्र उपचारदरम्यान सदर बलिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..

इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी येथील  एका 3 वर्षीय बलिकेला सोमवारी रात्रीच्या सुमारास घराच्या दाराजवळ आईच्या शेजारी बसली असताना अचानक बिबटया ने ह’ल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेलं. ही सर्व घटना मुलीचे आई,वडील,आजोबा, यांच्या समक्ष घडली.तात्काळ घरातील सर्वांनी आरडा ओरडा करत बिबट्याचा पाठलाग केला. यावेळी बिबट्याने काही अंतरावरील झुडपात ह्या चिमुरडीला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. सदर घटना समजताच इगतपुरी वन क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी आणि कर्मचारी यांनी जखमी बलिकेला तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या घटनेत बिबट्याने हल्ला केलेली चिमुरडी गं’भीर जखमी झाली होती. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार  सदर जखमी बलिकेला पुढील उपचारासठी नाशिक येथील जिल्ह्याग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे,या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.