नक्की काय हवंय.. दारू की कुटुंब…

सई जाधव, नाशिक

कोरोना लॉकडाऊन २४ मार्च २०२० रोजी भारतात सुरु झाला. बघता बघता सर्वच दुकानं, व्यवसाय, उद्योगधंदे बंद केली गेली. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता..कोरोना लॉकडाऊनचा फटका सगळ्यांनाच बसला. आणि ३ मे उजाडला.. हा लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला. नाशिक कॉलिंगने केलेल्या सर्वेप्रमाणे लोकांना लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर आधी काय काय करणार असे विचारले असता… “बाहेर चक्कर मारणार..”, कामावर जाणार, अशा प्रतिक्रिया आल्या होत्या.. पण ४ मे रोजी सकाळचे चित्र काही निराळच दिसलं…

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

समाजात इतके मद्यप्रेमी आणि व्यसनाधीन लोकं आहेत, ज्यांच्यासाठी दारू हे चैनीच्या गोष्टीपेक्षाही अधिक दैनंदिन गरज आहे. अशा लोकांनी सकाळपासूनच दारू दुकानांबाहेर अगदी एक किलोमीटरपर्यंत कुठल्याही सोशल डीस्टन्सचं भान न ठेवता रांगा लावल्या..हे अगदीच वाईट चित्र होतं.. खरोखरच दारू ही, आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या जीवनाहून अधिक महत्वाची आहे का..?

आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत.. कोरोना संपलेला नाही हे सर्वांना अवगत आहे..तरीदेखील समाजात वावरतांना हे असं वागणं, स्वत:ला लाजवणारं नाही का…? अशा काळात, फक्त कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आणि कुटुंबाचा विचार खरंतर केला गेला पाहिजे.. आजही कोरोना संसर्गाचा धोका आपल्या डोक्यावर टांगती तलवार ठेऊन आहे हे विसरता कामा नये… त्यामुळे सर्वानीच सार्वजनिक ठिकाणी जातांना मास्क वापरणे, फिजिकल डीस्टन्सचं भान ठेऊन आपल्या स्वत:ला, घरच्यांना, समाजाला, शहराला आणि देशाला कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लावला पाहिजे…

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू