नाशिक विभागात 26 हजार 176 रुग्णांवर उपचार सुरु; तर बरे होण्याचा दर 81.74 टक्के

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसते आहे.परंतु अशाही परिस्थितीत आरोग्य विभाग व प्रशासनाचे योग्य नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिसून येत आहे.  नाशिक विभागात आज पर्यंत 1 लाख 61 हजार 518 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत 26  हजार 176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत विभागात 3 हजार 315 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. विभागात जरी रूग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 81.74 टक्के असून मृत्युदर 2.05 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 83.12 टक्के:
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 64 हजार 002 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 हजार 201 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 9  हजार 628 रुग्णांवर उपचार सुर असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.12 टक्के इतके आहे. आजपर्यंत 1 हजार 173  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 32 हजार 941 रुग्णांना डिस्चार्ज :
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 43 हजार 899  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 हजार 941 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 9 हजार 851 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.03 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 107 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

धुळे जिल्ह्यात 1 हजार 041 रुग्णांवर उपचार सुरु :
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 610 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 10 हजार 222 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 041 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.04 टक्के इतके आहे. आजपर्यंत 347 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 4 हजार 341 रुग्णांवर उपचार सुरु:
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 37 हजार 121 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 हजार 200 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 4 हजार 341 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.74 टक्के इतके आहे. आजपर्यंत 580 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 315 रुग्णांवर उपचार सुरु:
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 4 हजार 886 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 हजार 463 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 315 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.87 टक्के इतके आहे. आजपर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि. 20 सप्टेंबर 2020 रोजीची रात्री 12.00 पर्यंतची माहिती )