नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६ जुलै) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६ जुलै) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८४ हजार ९६५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ०४ रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १६० ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १११,  बागलाण ५७, चांदवड ६८, देवळा १३, दिंडोरी ९५, इगतपुरी १९, कळवण २२, मालेगाव ५५, नांदगाव ४७, निफाड १३३, पेठ ००, सिन्नर २३२, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०३, येवला २५ असे एकूण ८८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८०  तर जिल्ह्याबाहेरील ०८ रुग्ण असून असे एकूण २ हजार ०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ३५४ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.७५ टक्के, नाशिक शहरात ९७.८३  टक्के, मालेगाव मध्ये ९६.५२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३७ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार १३ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ८९० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५६ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ३८५  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक