जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त; 3 हजार 528 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ११ हजार ५७३  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३ हजार ५२८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५२२  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १२३, चांदवड ३६, सिन्नर १४५, दिंडोरी ५४, निफाड २०७, देवळा ११२,  नांदगांव १०३, येवला ०९, त्र्यंबकेश्वर २५, सुरगाणा १०, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण ३०, इगतपुरी ४५, मालेगांव ग्रामीण ५१ असे एकूण  ९५२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ४५३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११८  तर जिल्ह्याबाहेरील ०५  असे एकूण ३ हजार ५२८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १५  हजार ६२३  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून नाशिक ग्रामीण मधे ७१.५९,  टक्के, नाशिक शहरात ७३.६८ टक्के, मालेगाव मध्ये  ८४.९०  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.७६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.२६ इतके आहे.

कोरोनामुळे झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १२२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २९५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८५  व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५२२  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज (दि. ३ ऑगस्ट २०२०) सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)