नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. 27 जुलै) 263 पॉझिटिव्ह; शहरात 219 तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २७ जुलै) एकूण २६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण ९५, नाशिक शहर २१९, मालेगाव ११, जिल्हा बाह्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १० मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ७, नाशिक ग्रामीणमध्ये ३ मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात सोमवारी एकूण २६३ रुग्ण बरे झाले आहेत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३५१ एकूण कोरोना रुग्ण:-७९१९ एकूण मृत्यू:-२५३(आजचे मृत्यू ०७)  घरी सोडलेले रुग्ण :- ५९७० उपचार घेत असलेले रुग्ण:- १६९६ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात सोमवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गुरुकृपा सदन, लेखानगर, सिडको येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) साईनाथ मंदिर, गणेशवाडी, पंचवटी येथील ५४ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) हिरावाडी नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) काझी गल्ली  नाशिक येथील ६० वर्षे वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) राजेंद्रनगर,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ६) हिरावाडी,पंचवटी येथील ५४ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.७) संजीव नगर,सातपूर येथील ३१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.