जिल्ह्यात आजपर्यंत २४ हजार ६९८ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २४ हजार ६९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २७३, चांदवड २८, सिन्नर २१५, दिंडोरी ५१, निफाड २७०, देवळा ४४,  नांदगांव ११३, येवला ४१, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०६, पेठ ०२, कळवण १३,  बागलाण १४३, इगतपुरी ११७, मालेगांव ग्रामीण २०३ असे एकूण १ हजार ५४१  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ७१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६९३  तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ४ हजार ९५५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३० हजार ४३८  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीणमध्ये ७६.८३,  टक्के, नाशिक शहरात ८४.५० टक्के, मालेगाव मध्ये  ६५.३२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८१.१४ इतके आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २१५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०६ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ७८५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. २५ ऑगस्ट २०२०) सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)