नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ फेब्रुवारी) ४२४ कोरोना पॉझिटिव्ह; दोन जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ फेब्रुवारी) ४२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी नाशिक मनपा: २६०, नाशिक ग्रामीण: १३१, मालेगाव मनपा: २५ आणि जिल्हा बाह्य ८ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा हद्दीत १ तर नाशिक ग्रामीणमध्ये १ असा समावेश आहे.

त्यामुळे आता  आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४५२, एकूण कोरोना  रुग्ण:- ७९,३८४, एकूण मृत्यू:-१०३६ (आजचे मृत्यू ०१), घरी सोडलेले रुग्ण :-७६,८४८, उपचार घेत असलेले रुग्ण:- १५०० अशी संख्या झाली आहे.