नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २१ जून) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २१ जून) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ०६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३२८ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ७ हजार ९६६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४४,  बागलाण ६१, चांदवड ८३, देवळा २५, दिंडोरी ८६, इगतपुरी १५, कळवण ३५, मालेगाव ८९, नांदगाव ५३, निफाड १५१, पेठ ०२, सिन्नर ३८०, सुरगाणा ०५, त्र्यंबकेश्वर ०४, येवला २५ असे एकूण १ हजार १५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २०४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११७ तर जिल्ह्याबाहेरील ११  रुग्ण असून असे एकूण २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९२ हजार ५२४ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.६६ टक्के, नाशिक शहरात ९७.८४ टक्के, मालेगाव मध्ये ९६.२७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३४  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ३ हजार ८१६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ६७४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५०  व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ७ हजार ९६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी दि. २१ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक