नाशिक शहरात रविवारी (दि. १८ एप्रिल) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ४० मृत्यू

नाशिक शहरात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

corona nashik news

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. १८ एप्रिल) ५७४९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३३६५, नाशिक ग्रामीण: २२४९, मालेगाव: ५० तर जिल्हा बाह्य: ८५ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १७, मालेगाव: २, नाशिक ग्रामीण २१ असा समावेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: १) लोखंडे मळा,जुना सायखेडा रोड, जेलरोड नाशिकरोड येथील ६४ वर्षीय वृद्ध महिला, २) आम्रपाली झोपडपट्टी, उपनगर येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, ३) घर नंबर ४६१४, राहुल वाडी, पंचवटी, नाशिक येथील ५६ वर्षीय पुरुष, ४) तीन पुतळे, फुले नगर, पेठ रोड, पंचवटी येथील ६१ वर्षीय वृद्ध महिला, ५) ६०, गायत्री नगर, कारभारी सोसायटी, मेरी आडगाव लिंक रोड,नाशिक येथील ५६ वर्षीय महिला, ६) फ्लॅट क्र.११,यशोदा नगर, आरटीओ ऑफिस, नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्ती, ७) १०, हरी दर्शन अपार्टमेंट, जय भवानी रोड, नाशिक येथील ३३ वर्षीय पुरुष, ८) पंचशील नगर, पूना रोड, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष, ९) आम्रपाली झोपडपट्टी, उपनगर,नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष तसेच…

१०) प्लॉट क्र.४१३, अमृतमय सोसायटी,पेठरोड, नाशिक येथील ५३ वर्षीय महिला, ११) मोहबाबा नगर, नाशिक रोड, नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्ती, १२) पंचवटी, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष, १३) आनंद नगर, पवन नगर, सिडको येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष, ४) स्वामी विवेकानंद नगर, सिडको,नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष, १५) कैलास नगर, नाशिक येथील ८१ वर्षीय वृद्ध महिला, १६) हनुमान वाडी, नाशिक येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्ती, १७)फ्लॅट क्र.२०४ प्लॉट क्र.४३०, सिद्धी पुजा ग्लोरी अपार्टमेंट, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, गंगापूर रोड, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष यांचा समावेश आहे.