नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५ जुलै) १६२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६३, नाशिक ग्रामीण: ९१, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ८४५० इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १५७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखला जावा म्हणून महापालिकेने दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. मात्र शहरात त्यानंतरही अनेक दुकाने सुरु असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.