नाशिक जिल्ह्यात (दि. ११ नोव्हेंबर २०२१) सद्यस्थितीत इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक कॉलिंगवर अत्यल्प दरात जाहिरात करण्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

नाशिक जिल्ह्यात (दि. ११ नोव्हेंबर २०२१) सद्यस्थितीत इतक्या रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार १६०  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत ५३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६८८  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३१,  बागलाण ०९, चांदवड १९, देवळा १८, दिंडोरी १८, इगतपुरी ०७, कळवण ०७, मालेगाव ०४, नांदगाव १०, निफाड ६५, पेठ ०१, सिन्नर ५८, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०३, येवला २५ असे एकूण २७६  पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २२७,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०८  तर  जिल्ह्याबाहेरील २०  रुग्ण असून असे एकूण ५३१   रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३७९  रुग्ण आढळून आले आहेत.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9007,9001,8998″]

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०२,  बागलाण ००, चांदवड ००, देवळा ०२, दिंडोरी ०१, इगतपुरी ००, कळवण ००,  मालेगाव ००, नांदगाव ०२, निफाड ०७, पेठ ००, सिन्नर ०२, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०० असे एकूण १६ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९७.१६ टक्के, नाशिक शहरात ९८.१७  टक्के, मालेगाव मध्ये ९७.११  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार २०४  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४  हजार  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी ही दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates